कोणत्याही जातकावर त्याच्या राहत्या परिवेशात सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. तर काही उपाय येथे आम्ही सांगत आहोत ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. अक्षय तृतीया या शुभ नक्षत्रावर जाणून घ्या काही उपाय ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल...
1. घराच्या मुख्य दारावर गणपतीचा
गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घराच्या मुख्या दारावर लावल्याने घरात धन संबंधी सर्व समस्या नाहीश्या होतात आणि घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू पात नाही.
2. गायीला चारा खाऊ घालावा
दररोज सकाळी स्नान व इतर नित्य कामातून निवृत्त होऊन गायीला हिरवा चारा किंवा कणीक खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
3. मुख्य दारावर दिवा लावावा
सकाळी पूजा करताना लक्ष्मी पूजन करावे आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा. या दोन कामांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात वास करते.
4. लग्न राशीच्या स्वामी ग्रहाला करा प्रसन्न
प्रत्येक जातकाची एक चंद्र रास असते आणि या प्रकारेच कुंडलीत जन्म संबंधी एक लग्न रास असते. जातक गुण आणि व्यवहाराला लग्न रास मोठ्या प्रमाणावर प्रभावित करते.
कामात अडथळे येत असल्यास किंवा आर्थिक रूपात समस्या येत असल्यास आपल्या लग्न राशीच्या स्वामी ग्रहानुकूल रंगाची एखादी वस्तू स्वत:जवळ ठेवावी किंवा स्वामी ग्रहाशी संबंधित रुमाल किंवा कापड आपल्याजवळ असू
द्यावा.
5. घरात तुळशीचं झाडं लावावं
तुळशीची सेवा केल्याने धन-धान्यात कुठलीच कमी भासत नाही. तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावल्याने आणि तुळशी पूजन केल्याने लक्ष्मीची कृपा राहते.
6. योग्य जागेवर असावे कपाट
धन ठेवत असलेले कपाट उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण दिशेच्या भीतींवर असावे. याने धनवृद्धी होते.