एकादशीला तांदुळाचे कोणत्याही रूपात सेवन करू नये. तांदूळ खाल्ल्याने मन चंचल होतं आणि प्रभू भक्तीमध्ये मन रमत नाही.
पौराणिक कथेनुसार देवीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी महर्षी मेधाने शरीर त्याग करून त्याचं अंश पृथ्वीत सामावलं होतं. तांदूळ आणि जवस या रूपात महर्षी मेधा उत्पन्न झाले म्हणून तांदूळ आणि जवस जीव मानले गेले आहेत.
एकादशीला सकाळी दातुन करणे वर्ज्य मानले गेले आहे परंतू हे शक्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही फुलं आणि पानं तोडणे वर्जित आहे.
एकादशीला उपास करणे शक्य नसले तरी हरकत नाही परंतू ब्रह्मचर्याचे पालन नक्कीच करावे. या दिवशी संयम बाळगणे आवश्यक आहे.
एकादशीला बिछान्यावर न झोपता जमिनीवर झोपावे.
एकादशी आणि दुसर्या दिवशी द्वादशीला तुळशीचे पाने तोडू नये.
मांस आणि मादक पदार्थाचे सेवन चुकून करू नये. तसेच अंघोळ झाल्यावरच काही ग्रहण करावे.
एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये याने पाप लागतं. खोटं बोल्याने मन दूषित होतं आणि दूषित भक्तीने केलेली पूजा फळत नाही. या दिवशी चुकून देखील क्रोध करू नये.
देवउठनी एकादशीला धान्य, डाळी, आणि बीन्स ग्रहण करणे टाळावे.
या दिवशी उपास करणार्यांनी केवळ पाणी पिणे सर्वोत्तम ठरेल परंतू असे करणे शक्य नसल्यास फळं, दूध किंवा इतर फळाहार घेता येईल.
एकादशी व्रताचं मुख्य उद्देश्य शरीराच्या गरजा कमीत कमी असाव्या आणि अधिकाधिक वेळ आध्यात्मिक लक्ष्याची पूर्तीसाठी असावा.