rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घराचे वातावरण बदलून देईल हा एक उपाय

small solution
नियमित रूपेण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घर आणि व्यापार स्थानात सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात उपस्थित हानिकारक सूक्ष्म कीटाणु देखील नष्ट होऊन जातात. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, यामुळेच घरात सदैव प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनून राहतो. असे मानले जाते की हा लहानसा उपाय तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो.  
 
गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तीन वातीचा दिवा, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सातमुखी दिवा, व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुद्ध देशी गायीच्या तुपाचा दिवा व शत्रू आणि विरोधीकांना दूर ठेवण्यासाठी काल भैरवच्या समोर सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी  महुयेच्या तेलाचा दिवा लावल्याने अल्पायु योग देखील नष्ट होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कारणं