Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चार प्रकाराचे भक्त, जाणून घ्या आपण कोणत्या प्रकाराचे आहात

चार प्रकाराचे भक्त, जाणून घ्या आपण कोणत्या प्रकाराचे आहात
संध्यावंदन, योग, ध्यान, तंत्र, ज्ञान, कर्म व्यतिरिक्त भक्ती देखील मुक्तीचा एक मार्ग आहे. भक्ती अनेक प्रकाराची असते. यात श्रवण, भजन-कीर्तन, नाम जप-स्मरण, मंत्र जप, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, पूजा-आरती, प्रार्थना, सत्संग इतर सामील आहे. याला नवधा भक्ती असे ही म्हणतात. तरी आम्ही आपल्याला सांगू गीतामध्ये उल्लेखित चार प्रकाराच्या भक्तांबद्दल.
 
नवधा भक्ती काय?
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
1. श्रवण 2. कीर्तन, 3. स्मरण, 4. पादसेवन, 5. अर्चन, 6. वंदन, 7. दास्य, 8. सख्य और 9. आत्मनिवेदन.
 
चार प्रकाराचे भक्त-
गीतामध्ये प्रभू श्रीकृष्ण म्हणतात-
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।। (७।१६)
 
अर्थात :- हे अर्जुन! आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी- या चार प्रकाराचे भक्त माझे भजन करतात. यात सर्वात निम्न श्रेणीचा भक्त अर्थार्थी आहे. त्याहून श्रेष्ठ आर्त, आर्त हून श्रेष्ठ जिज्ञासू, आणि जिज्ञासू हून श्रेष्ठ ज्ञानी आहे.
 
1. आर्त :- आर्त भक्त शारीरिक कष्ट झाल्यावर किंवा धन-वैभव नष्ट झाल्यावर आपले दु:ख दूर करण्यासाठी देवाला हाक मारतो.
 
2. जिज्ञासू :- जिज्ञासू भक्त स्वत:च्या शरीराच्या पोषणासाठी नाही तर संसाराला अनित्य जाणून प्रभू तत्त्व जाणून घेण्याच्या जिज्ञासाने भजन करतो.
 
3. अर्थार्थी :- अर्थार्थी भक्त भोग, ऐश्वर्य आणि सुख प्राप्तीसाठी भजन करतो. त्यासाठी भोगपदार्थ आणि धन मुख्य असतं आणि प्रभूचे भजन उपेक्षणीय.
 
4. ज्ञानी :- आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू तर सकाम भक्त आहे ज्ञानी भक्त सदैव निष्काम असतो. ज्ञानी भक्त प्रभू व्यतिरिक्त कुठलीच आस ठेवत नसतो. म्हणून प्रभू ज्ञानीला आपली आत्मा म्हणतो. ज्ञानी भक्ताचे योगक्षेमाचे वहन प्रभू स्वत: करतात.
 
यातून कोणता भक्त संसारात सर्वश्रेष्ठ?
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।।17।।
 
अर्थात : यातून परमज्ञानी असून शुद्ध भक्ती लीन असणारा भक्त सर्वश्रेष्ठ आहे कारण मी त्याला आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. या चार वर्णांतून भक्तीमध्ये लीन ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आत्मा न स्त्री असते न पुरूष