Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसंत पंचमी : देवी सरस्वतीची पूजा करण्याचा सण

वसंत पंचमी : देवी सरस्वतीची पूजा करण्याचा सण
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (20:17 IST)
वसंत पंचमीचा सण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हा सण पूर्वी भारतात मोठ्या  उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बायका पिवळे कपडे घालून पूजा करतात. संपूर्ण वर्षाला ज्या सहा हंगामात वाटले आहे, त्यामध्ये वसंत ऋतू हा लोकांचा आवडीचा हंगाम आहे.
 या काळात  फुले उमलतात, बहरतात,शेतांमध्ये मोहरीचं सोनं चमकतं, बाली आणि गव्हाचे कणीस बहरतात, आंब्याच्या झाडांवर बौर किंवा कळ्या येतात.सर्वीकडे फुलपाखरे उडू लागतात, तेव्हा वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो.   
  
वसंत पंचमी कथा-
सृष्टीच्या प्रारंभिक काळात ब्रह्माजींनी भगवान श्रीहरी विष्णू ह्यांच्या आज्ञाने मनुष्य योनी चे निर्माण केले, परंतु ते या रचनेपासून समाधानी नव्हते, तेव्हा त्यांनी विष्णूजींकडून परवानगी घेऊन आपल्या कमंडळु मधून पाणी घेऊन ते पृथ्वी वर शिंपडले, ज्यामुळे पृथ्वीवर कंपन होऊ लागलं आणि त्यामधून एक अद्भुत चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकटली. ज्यांच्या एका हातात वीणा आणि दुसरा हात वर देताना होता. आणि इतर दोन्ही हातात पुस्तक आणि माळ होत्या. जेव्हा या सुंदर स्त्रीने आपल्या मधुर वीणेतून स्वर काढले तेव्हा जगातील सर्व प्राणी आणि जीवांना आवाज आला. तेव्हा ब्रह्माजींनी त्या देवीला वाणीची देवी सरस्वती असे नाव दिले.
 
सरस्वतीला बागेश्वरी,भगवती,शारदा,वीणावादीनी,आणि वाग्देवी अशी अनेक नावाने पुजतात. संगीताची उत्पत्ती त्यांनीच केल्यामुळे त्यांना संगीताची देवी देखील म्हणतात. वसंत पंचमी त्यांचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा करतात. पुराणानुसार श्रीकृष्णाने देवी सरस्वतीवर प्रसन्न होऊन त्यांना वर दिले की वसंत पंचमीच्या दिवशी आपली पूजा केली जाईल. याच कारणास्तव हिंदू धर्मात वसंत पंचमीच्या दिवशी विद्येचीं देवी सरस्वती ह्यांची पूजा केली जाते.  
 
सणाचे महत्त्व -
वसंत ऋतूमध्ये मनुष्यच नव्हे तर प्राणी-पक्षी देखील आनंदी होऊ लागतात. तसे तर संपूर्ण माघ महिना खूपच उत्साहवर्धक असतो. तरीही वसंत पंचमी चा सण आपल्या साठी विशेष महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून या दिवशी ज्ञान आणि कलेची देवी आई सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवशी आई शारदेची पूजा करून त्यांच्या कडून विद्यावान, ज्ञानी होण्याचा आशीर्वाद मागितला जातो. तसेच या दिवशीचे महत्त्व कलाकारांमध्ये देखील आहे. कवी,लेखक,गायक,वादक,नाटककार, नर्तक आपल्या वाद्यांच्या पूजे सह आई सरस्वतीची पूजा करतात. 
 
पूजेची कृती -
या दिवशी सकाळी उठल्यावर हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे तेलाचे उटणे शरीरावर लावून अंघोळ करावी. नंतर पिवळे कपडे घालून आई शारदेची पूजा करावी. घरात गोड केशरी भात बनवून त्याचा नैवेद्य दाखवून त्याचे सेवन करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समर्थ मठात नाही, देवळात नाही, हृदयात बसतो