* वसंत पंचमीला आईवडीलांना आपल्या लहान मुलांना मांडीवर घेऊन बसावे. मुलांच्या हातून गणपतीला फूल अर्पित करवावे. स्वस्तिवचन पाठ करून मुलांच्या जिभेवर मधाने 'ऐं' लिहावे.
* पाटीवर किंवा कागदावर रक्त चंदन शाई म्हणून वापरत डाळिंबाच्या कलमाने 'ऊँ', 'श्रीं', 'अं' आणि 'ऐं' लिहवून अक्षराभ्यास करवावे.
* मोठ्या मुलांकडून या मंत्राचे उच्चारण करवावे:
सरस्वती महामाये दिव्य तेज स्वरूपिणी।
हंस वाहिनी समायुक्ता विद्या दानं करोतु मे।
असे केल्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि त्यांची स्मरण शक्ती वाढेल.