Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vinayak Chaturthi 2022: कधी आहे नवीन वर्षाची पहिली विनायक चतुर्थी? तिथी आणि पूजा मुहूर्त बघा

Vinayak Chaturthi 2022: कधी आहे नवीन वर्षाची पहिली विनायक चतुर्थी? तिथी आणि पूजा मुहूर्त बघा
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (16:22 IST)
Vinayak Chaturthi 2022: हिंदू कॅलेंडरनुसार विनायक चतुर्थीचा उपवास कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. पौष महिन्याचा शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे 2022 या वर्षाची पहिली चतुर्थी लवकरच येणार आहे. पौष महिन्यातील विनायक चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हणतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास ठेवला जातो. विनायक चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्र बघू नये. जर तुम्हाला या दिवशी चंद्र दिसला तर तुम्हाला खोटा कलंक लागण्याची शक्यता असते. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णावर सम्यक रत्न चोरल्याचा आरोप होता. 
जाणून घेऊया नवीन वर्षाचा पहिला विनायक चतुर्थी व्रत कधी आहे, पूजा आणि चंद्रोदयाची वेळ कोणती आहे?
विनायक चतुर्थी 2022 तारीख आणि पूजा मुहूर्त
पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 05 जानेवारीला दुपारी 02:34 वाजता सुरू होत आहे. ती रात्री उशिरा 12.29 वाजता संपत आहे. अशा स्थितीत विनायक चतुर्थी व्रत उदयतिथीच्या तिथीनुसार 06 जानेवारीला ठेवण्यात येणार आहे कारण 05 जानेवारीला दुपारपासून चतुर्थी सुरू होत असून 06 जानेवारीला रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होणार आहे.
उदयतिथी हे व्रत, स्नान इत्यादींसाठी वैध असल्याने विनायक चतुर्थी व्रत गुरुवार, 06 जानेवारी रोजी ठेवण्यात येणार आहे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपारी गणेशाची पूजा केली जाते. 06 जानेवारी रोजी तुम्हाला गणेश पूजेसाठी 01 तास 04 मिनिटे मिळतील. विनायक चतुर्थी पूजेचा मुहूर्त दुपारी 11.25 ते 12.29 पर्यंत आहे.
विनायक चतुर्थीचे व्रत करून व्रत कथा ऐकल्याने मनोकामना पूर्ण होतात. गणेशजींच्या कृपेने सर्व कार्य सफल होतात. जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य येतं.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Garuda Purana: अंत्यसंस्कारानंतर आपण मागे वळून का पाहत नाही? खरे कारण जाणून घ्या