Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vivah Panchami 2022: लग्नाला उशीर होत असेल तर विवाह पंचमीच्या दिवशी हे तीन उपाय करा

vivah panchami
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (16:30 IST)
विवाहपंचमी मार्गशिर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. विवाह पंचमीची तारीख सोमवार, 28नोव्हेंबर 2022  रोजी आहे. या दिवशी भगवान राम आणि माता सीता विवाहबंधनात अडकले होते असे पौराणिक कथेत सांगितले जाते. ज्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा वैवाहिक संबंध तुटले आहेत त्यांच्यासाठी 'विवाह पंचमी' खूप शुभ परिणाम घेऊन आली आहे.  काही उपायांबद्दल सांगणार आहोत, जे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
 
1. रामचरितमानस वाचा
जर तुमचे लग्न जमले असून ते कुठल्याही कारणाने तुटत असेल तर विवाह पंचमीच्या दिवशी रामचरितमानसाचे पठण करावे, असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
 
2. प्रभू राम आणि माता सीतेचा विधिवत विवाह करा
तुम्ही लग्नाचे वय गाठले आहे, परंतु तुम्हाला योग्य नातेसंबंध सापडत नाहीत, म्हणून तुम्ही या दिवशी प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाह करावा. यासोबत जर कुंडलीत मांगलिक दोष असेल तर तोही संपतो.
 
3. इच्छित वर मिळवायचे आहे असेल तर 
जर तुम्हाला इच्छित वराची अपेक्षा असेल, परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर विवाहपंचमीच्या दिवशी सीता मातेला सुहाग सामग्री अर्पण करा आणि गरजू सुहागनांना दान करा, तुम्हाला तुमचा इच्छित वर मिळण्याची शक्यता आहे.
 
टीप - आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती कुंडलीच्या सामान्य लक्षणांच्या आधारे सांगत आहोत, व्यक्तीनुसार समस्या बदलू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरगुती पंडितांकडून सूचना घेणे आवश्यक आहे.
Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mangalgraha Mandir Amalner मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान