Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

simant pujan
, बुधवार, 5 मार्च 2025 (20:49 IST)
हे कार्यक्रम कार्यालयात केले  जाते आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वी हे विधी करतात.वराचे पिता वधुची पूजा करतात. तिचे औक्षण करून तिला कुंकु लावून पेढयाचा पुडा, साडी, दागिने, देतात.वराची आई मुलीची  ओटी भरते. याला वांग्ड्निश्चय  म्हणतात.
या नंतर सीमांतपूजनाचा कार्यक्रम केला जातो. 
पूर्वीच्या काळी हा कार्यक्रम वधूच्या घरी करायचे. वर आणि वऱ्हाडी वधूच्या गावी जायचे. गावाच्या सीमेवर वधूचे आई वडील वर पक्षाची पूजा सीमेवर करण्यासाठी आणायला जायचे व पूजा करायचे. म्हणून या पूजेला सीमांत पूजन असे म्हणतात. या विधी मध्ये वधु पक्षाचे आई वडील वराची पूजा करतात आणि त्याला रुपया व नारळ, यथायोग्य कपडे, अंगठी, सोनसाखळी, वरदक्षिणा दिली जाते.  

वधू पक्षाकडे  ज्येष्ठ जावई असल्यास  त्यांची  पूजा देखील जाते आणि त्यांचे औक्षण करून त्यांना कपडे, पैसे दिले जाते.नंतर मुलीच्या घरातील बायका वर पक्षाकडील  बायकांचे पाय धुतात त्यांनाओटी देऊन त्यांना वाण देतात.
ALSO READ: मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
त्यांच्या डोक्यावर बत्ताशे ठेऊन फोडतात.सर्वप्रथम वराचे पाय धुवून त्याच्या डोक्यावर बत्ताशे ठेऊन फोडतात.
हा सर्व प्रकार गमतीचा एक भाग आहे. नंतर व्याह्यांची भेट घेतली जाते. तसेच मुलाचे वडील आपल्या सर्व नातेवाईकांची भेट मुलीच्या वडिलांशी करवतात. याच प्रकारे वधूचे वडील आपल्या नातेवाईकांची भेट मुलाच्या वडिलांशी करवतात. वधू ची आई आणि वराची आईची गळाभेट देखील घेतली जाते.अशा प्रकारे वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजनाचा हा सोहळा केला जातो. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: केळवण आणि ग्रहमख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)