गुरुवार हा श्री हरी विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा दिवस मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी अशी काही कामे आहेत, जी केल्याने जीवनात नकारात्मकता येते.
तुम्हाला माहीत आहे का अशी कोणती 7 कामे, जी गुरुवारी करू नयेत-
1. अटाळा : गुरुवारी घराती साफ-सफाई करणे टाळावे आणि या दिवशी घरातून अटाळा किंवा भंगार बाहेर काढू नये. कारण गुरुवारी घराची अती सफाई किंवा कोळीचे जाळे स्वच्छ करणे शुभ मानले जात नाही.
2. नखं कापू नये : गुरुवारी नखं कापणे अशुभ मानले गेले आहे. यानी धन हानी होण्याची शक्यता असल्याचे म्हणतात. याने घरातील प्रमुख व्यक्तीची प्रगती थांबते आणि घरात पीडा येऊ शकते.
3. शेव्हिंग करणे : कोणचाही कुंडलीत दुसरे आणि अकरावे घर ही संपत्तीची स्थाने असतात. गुरू हा या दोन्ही स्थानांचा कारक ग्रह आहे. गुरुवारी गुरु ग्रह कमजोर करणारी कामे केल्याने संपत्तीची वाढ थांबते. त्यामुळे दाढी आणि डोक्याचे केस कापू नयेत.
4. केस कापणे : या दिवशी केस कापणे टाळावे. या दिवशी महिलांनी केस कापल्याने संतान आणि पतीच्या जीवनावर चुकीचा प्रभाव पडतो. त्याची प्रगती बाधित होते.
5. लादी पुसणे : ज्याप्रमाणे गुरूचा प्रभाव शरीरावर कायम राहतो, त्याचप्रमाणे घरावर गुरूचा प्रभावही तितकाच खोल असतो. वास्तूनुसार घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्याचा स्वामी गुरु आहे. ईशान्य ही धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे. त्यामुळे या दिवशी फरशी पुसल्याने घराचा ईशान्य कोपरा कमजोर होतो. कुटुंबातील सदस्यांची मुले, पुत्र, शिक्षण, धर्म इत्यादींवर शुभ प्रभाव कमी होतो. म्हणूनच गुरुवारी पोछा लावणे टाळावे.
6. केस धुणे : महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळावे. महिलांच्या जन्म कुंडलीत बृहस्पती ग्रह पतीचा कारक असतो. सोबतच बृहस्पती संतानाचा कारक आहे. या प्रकारे बृहस्पति ग्रह संतान आणि पती दोघांच्या जीवनावर प्रभाव टाकतो. गुरुवारी केस धुतल्याने बृहस्पती कमजोर होतो आणि शुभ प्रभावात कमी येते.
7. मोहरी किंवा तिळाचा दिवा लावू नका : हिंदू धर्मानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यामुळे गुरुवारी विष्णूची पूजा करताना मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावू नये. असे केल्याने श्रीहरी क्रोधित होतात आणि त्यांच्या भक्तांना व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे या दिवशी शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे योग्य आहे.
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.