Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

का जपतो आपण गायत्री मंत्र? जाणून घ्या अर्थ आणि त्याचे 7 फायदे

gayatri devi
, बुधवार, 27 एप्रिल 2022 (23:40 IST)
मनाला शांती मिळवून देण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप खूप फायदेशीर आहे. गायत्री मंत्र हे चार वेदांचे मुख्य सार मानले जाते. त्यांची उत्पत्ती गायत्री मंत्रापासून झाली आहे, म्हणून गायत्री मातेला वेद माता म्हणतात. त्रिदेव जिची पूजा करतात, ज्याचे ते ध्यान करतात, ती गायत्री माता देव माता. ज्येष्ठ महिन्यात गायत्री जयंती असते. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला गायत्री मातेचे दर्शन झाले होते. गायत्री मातेची उपासना करणे आणि मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे. गायत्री मंत्राचा अर्थ आणि फायदे जाणून घेतात .
 
गायत्री मंत्र
ओम भुरभुव: स्व: त्सवितुर्वरेण्यम् भार्गो देवस्य धीमहि ध्यायो न: प्रचोदयात्।
 
गायत्री मंत्राचा अर्थ असा आहे
की, जीवनाचे स्वरूप, दु:खाचा नाश करणारा, आनंदाचे स्वरूप, तेजस्वी, श्रेष्ठ, पापाचा नाश करणारा परमात्मा आपण आपल्या आत्म्यात धारण केला पाहिजे. जो आपल्या बुद्धीला योग्य मार्गाची प्रेरणा देतो.
 
गायत्री मंत्राचा जप केव्हा करावा
1. सूर्योदयापूर्वी
2. दुपारी
3. सूर्यास्तापूर्वी
 
गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे
1. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत आणि एकाग्र राहते.
 
2. या मंत्राचा जप केल्याने दुःख, कष्ट, दारिद्र्य, पाप इत्यादी दूर होतात.
 
3. संततीप्राप्तीसाठी गायत्री मंत्राचाही जप केला जातो.
 
4. कामात यश, करिअरमध्ये प्रगती इत्यादीसाठी गायत्री मंत्राचा जप करावा.
 
5. विरोधक किंवा शत्रूंमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तूप आणि नारळाचा हवन करा. त्या वेळी गायत्री मंत्राचा जप केला जातो.
 
6. ज्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे, त्यांनी नियमितपणे गायत्री मंत्राचा जपमाप करावा.
 
7. पितृ दोष, काल सर्प दोष, राहू-केतू आणि शनी दोष यांच्या शांतीसाठी शिव गायत्री मंत्राचा जप करावा.
 
(अस्वीकरण: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिश्चरी अमावस्येचा दिवशी करा हे उपाय