Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नामध्ये वधूद्वारे तांदूळ फेकण्याच्या विधीचे काय आहे महत्व ?

webdunia
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (22:40 IST)
हिंदू धर्मातील विवाहांमध्ये प्रत्येक विधी आणि प्रथेला स्वतःचे महत्त्व आहे. लग्नादरम्यान होणारे प्रत्येक विधी कोणत्या ना कोणत्या कारणाने केले जातात. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धा असते. लग्नाच्या निरोपाच्या वेळी मुलगी ताटातील तांदूळ मागे फेकते आणि नंतर मागे वळून पाहत नाही हे तुम्ही पाहिलेच असेल.
 
तुमच्यापैकी अनेकांना हा विधी विचित्र वाटेल. पण तुम्ही कधी तांदूळ फेकण्याच्या विधीचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का, नाही तर तो का केला जातो ते जाणून घेऊया.
 
नववधू विदाईमध्ये तांदूळ का टाकते?
वास्तविक, तांदूळ फेकण्याचा विधी हा लग्नातील शेवटचा विधी असतो. त्यानंतर ती मुलगी दुसऱ्या घरी जाते. जेव्हा मुलगी विदाईच्या वेळी तांदूळ मागे फेकते तेव्हा मुलीचे आईवडील किंवा घरातील वडीलधारी सदस्य ते त्यांच्या पदरात गोळा करतात.
 
तांदूळ फेकण्याचा समारंभ कसा केला जातो?
लग्नातील सर्व विधी आटोपून आणि डोलीत बसण्याआधी नववधू घरातून बाहेर पडताना तिची बहीण, मैत्रिण किंवा घरातील इतर कोणतीही स्त्री हातात तांदळाचे ताट घेऊन तिच्या शेजारी उभी असते. या ताटातून वधूला दोन्ही हातांनी ५ वेळा तांदूळ उचलावा लागतो. वधू आपल्या दोन्ही हातांनी तांदूळ पाच वेळा मागे फेकते. तांदूळ इतका जोरात फेकून द्यावा लागतो की तो मागे उभ्या असलेल्या संपूर्ण कुटुंबावर पडतो. वधूच्या मागे उभे असलेले कुटुंब हे तांदूळ त्यांच्या पिशव्या, पल्लू किंवा हात पसरून त्यांच्याकडे ठेवतात. विधीनुसार हे तांदूळ कोणाकडे जातात, ते सुरक्षित ठेवावे लागतात.  
 
निरोप घेताना तांदूळ फेकण्या मागेची मान्यता काय आहे
वास्तविक असे मानले जाते की मुलगी ही घराची लक्ष्मी असते, जर तिने विदाईच्या वेळी हा विधी केला तर तिच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. असे मानले जाते की जेव्हा वधू तांदूळ मागे फेकते तेव्हा ती अपेक्षा करते की धन धान्याने संपन्न असो.
 
दुसरीकडे, असाही एक विश्वास आहे की हा विधी आपल्या पालकांना आणि कुटुंबाचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांनी तिच्यासाठी जे काही केले त्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुधवारी गणपतीला या एका वस्तूने प्रसन्न करा, देव श्रीमंत करेल