Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात गोमूत्र का शिंपडावे?

घरात गोमूत्र का शिंपडावे?
, शनिवार, 10 जुलै 2021 (11:49 IST)
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात काही अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.
 
सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.
 
काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडणे. 
 
गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे. 
 
आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत  आहे. गोमूत्र  शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंढरपुरमधील पांडुरंगाच्‍या मुर्तीवर आहे शिवलिंग, जाणून घ्या त्‍यामागील कथा