Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधान! पंचक सुरू , 9 डिसेंबरापर्यंत करू नाही हे काम...

सावधान! पंचक सुरू , 9 डिसेंबरापर्यंत करू नाही हे काम...
भारतीय ज्योतिषात पंचकाला अशुभ मानले जाते. याच्या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात.  पंचकात काही विशेष काम करण्याची मनाई आहे. 5 डिसेंबरच्या संध्याकाळपासून पंचक सुरू झाले आहे.
 
पंचक पाच प्रकारचे असतात. 
 
1 . रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.  
 
2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते. 
 
3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,  व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.  
 
5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. 
 
6. त्या शिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्‍या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकात पाच कामांशिवाय इतर कुठले ही शुभ काम करू शकता.
 
 
मुहूर्त चिंतामणी ग्रंथानुसार पंचकांच्या नक्षत्रांचे शुभ फल
1. घनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र चल संज्ञक मानले जाते. यात चलीत कामं करणे शुभ मानले गेलं आहे - यात्रा करणे, वाहन खरेदी,  मशीनरी संबंधित काम सुरू करणे शुभ मानले गेले आहे.   
2. उत्तराभाद्रपद नक्षत्र स्थिर संज्ञक नक्षत्र मानले गेले आहे. यात स्थिरता असणारे काम करायला पाहिजे जसे - बिया पेरणं, गृह प्रवेश, शांती पूजन आणि जमिनीशी निगडित स्थिर कार्य केल्याने यश मिळतो.  
3. रेवती नक्षत्र मैत्री संज्ञक असल्यामुळे या नक्षत्रात वस्त्र, व्यापाराशी निगडित सौदे करायला पाहिजे, एखाद्या विवादाचा निपटारा करणे, दागिन्याची खरेदी करणे इत्यादी काम शुभ मानण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाभारताच्या 8 अशा गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहित आहे!