Article Hinduism Marathi %e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%b8 108031800006_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंस

कंस
जेथे व्दैत असते तेथेच भीती वास करते.

मथुरेत जो पर्यंन्त कंसाचे राज्य होते तो पर्यंन्त जनतेत शान्ती नव्हती. त्या अशांत प्रजेला शान्ती मिळावी म्हणूनच श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. हा कंस कोण? अस्ति आणि प्राप्ती या कंसाच्या दोन बायका. अस्ती म्हणजे बँक अर्थात तिजोरी मधील रोकड आणि प्राप्ती म्हणजे कमाई. माझ्या जवळ इतके पैसे आहेत ते वाढविण्या करता मला आणखी कमाई करायची आहे. हे विचार ज्याच्या मनात सदैव घुमतात ते प्राप्त करण्यास जो न्याय अन्यायाचा विचार करीत नाही तो कंस.

''क'' चा अर्थ संहार. न्याय अन्यायाचा विचार न करता संपत्ती प्राप्त करून आपल्या सर्व सुखाचा नाश करणार्‍याला कंस असे म्हणतात. अशा माणसाच्य जीवनात शान्ती प्राप्त होणे शक्य नाही कारण पैशानेच अशान्ती निर्माण होते.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi