Article Hinduism Marathi %e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a4%b0 %e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 107081300001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कहाणी सोमवारची खुलभर दुधाची

कहाणी सोमवारची खुलभर दुधाची
NDND
ऐका परमेश्वरा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडतं कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ति सांगितली. राजानं दवंडी पिटली, गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं! सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही़, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभार्‍यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही.

webdunia
NDND
दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाच आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्यां जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, चार तांदळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली, जय महादेवा नंदिकेश्वरा! राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भर्‍यात घातलं पण तुझा गाभार भरला नाही. माझ्या खुल दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते! असं म्हणून राहिलेले दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभार भरून गेला. हे गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसर्‍या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसलिवले. तरीहि शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला.

webdunia
NDND
पुढे तिसर्‍या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभार भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं! वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून भरत नाही! याला युक्ती काय करावी? मुलावासरांना दूध पाजावं, घोरघर सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल, नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावांत दवंडी पिटविली.

चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली, मुलाबाळांना, गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकीसुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू. ही साठां उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Share this Story:

Follow Webdunia marathi