Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्ञान मार्ग व भक्तिमार्ग

ज्ञान मार्ग व भक्तिमार्ग

सौ. कमल जोशी

जो परमेश्वर प्राप्ती करता किंवा परोपकार करण्याकरता रडतो त्याला जीवनात रडण्याची वेळच येत नाही.
जीवनात वैराग्यप्राप्ती ाली की ज्ञान मार्गात यश मिळते तर पूर्ण सद्भाव जागा झाला तर भक्तिमार्गात सफलता प्राप्त होते. ज्ञानी कुणाच्याही सुख दु:खाने सुखी किंवा दु:खी होत नाही. त्याला स्वत:च्या शरीराचेही सुख दु:खाने प्रभावित करीत नाही. कारण त्याने प्रेमाचा त्याग करून सर्वत्र समतेचा अनुभव घेतला असतो. व आनंदमय जीवन जगत असतो. उलट भक्त सर्वामध्ये ईश्वराचा अनुभव घेतो. त्याच्या स्वत:च्याही अंत:करणात प्रभूचा वास आहे म्हणून दुसर्‍याचे दु:ख तेच माझे दु:ख ही भावना भक्ताची होते.
दुसर्‍याचा आनंद तोच माझा आनंद असे समजून भक्त सर्वत्र आनंदाचा अनुभव घेतो. सामान्य माणसाकरता ज्ञानमार्ग कठीन आहे, कारण त्याग करणे कठीन आहे. त्या पेक्षा सर्वत्र ईश्वराचा वास आहे म्हणून सर्वावर प्रेम करणे हा भक्तिमार्ग सोपा आहे, उत्तम आहे.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी

जो वाचिक पाप करतो तो दुसर्‍या जन्मी मुका होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi