आपल्या व्यवसायात धर्माची आठवण ठेवावी
ज्याचे डोळे बिघडतात त्याचे सारेच बिघडते, पाप सर्वात पहिले डोळ्यात शिरते. मग मनात प्रवेश करते. मग वाचेत उतरते शेवटी ते आचरणात येते. डोळ्यांमुळे मनही बिघडते, मन बिघडले की जीवन बिघडते, रावणाच्या डोळ्यात काम व हिरण्याक्षाच्या डोळ्यात लोभ होता म्हणून त्याच्या जीवनाचा नाश झाला व नाव बदनाम झाले. म्हणून कोणी आपल्या मुलांची नावे रावण किंवा हिरण्याक्ष ठेवित नाहीत. हिरण्याक्षचे पाय जमिनीवर असले तरी डोके स्वर्गाला टेकत असे. त्याच्या राज्यात प्रजा कष्टी होती. जो राजा लोभी असतो त्याच्याकडून अनंत पापे होत असतात, त्याची प्रजा दु:खी असते. असा हिरण्याक्ष आमच्या डोळ्यात कधीच येऊन बसू नये याची विवेकपूर्वक काळजी घ्यावी.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा