आपली सर्वप्रथम आणि अगदी पहिली बांधिलकी म्हणजे या जगात सेवा करणे.
जर तुमच्या जीवनात भय असेल तर ते बांधिलकीच्या अभावामुळेच. जर तुमच्या जीवनात गोंधळ असेल तर तो बांधिलकीच्या अभावामुळेच.
मी इथे या जगात सेवा करण्यासाठी आहे, हाच विचार ‘मी’ला विरघळून टाकतो आणि जेव्हा ‘मी’ विरघळतो तेव्हा सार्या काळज्याच मिटतात. सेवा ही सोयीनुसार किंवा आनंदासाठी करण्याची एखादी गोष्ट नाही. सेवा करत राहाणे हाच जीवनाचा अंतिम उद्देश आहे.
अनिर्बध मन दु:खी असते. बांधिलकी असलेल्या मनाला खडतर अनुभव येतील पण त्यांच्या कष्टाची फळे ते वेचतील.
जेव्हा तुमची सेवा हा तुमच्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनवता तेव्हा भय गळून पडते. मनाची एकात्मता आणि हेतूपूर्तता, क्रियाशीलता आणि दूरगामी आनंद आणि कदाचित अल्पकालीन समस्या येतील.
श्री श्री रविशंकर
‘मौन एक उत्सव’मधून साभार