Article Hinduism Marathi %e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%82 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%82 107121500006_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवासाठी घरं बांधणारी माणसं

- महेश जोशी

देवासाठी घरं बांधणारी माणसं
PRPR
देवाची पूजा हा हिंदू संस्कृती मानणाऱ्यांच्या घरातील एक दैनंदिन उपचार आहे. त्यामुळे देवघर नसणारं घर सापडणं मुश्किल. घरात देवांसाठी एक जागा असतेच. ती जास्तीत जास्त चांगली, पवित्र रहावी यासाठी घरच्यांचा प्रयत्न असतो. देव ठेवण्यासाठी पुन्हा स्वतंत्र देवघरही बांधलं जातं किंवा तयार करून घेतलं जातं. ईश्वराची पूजा केल्याने मनःशांती लाभते. प्रचंड उर्जेचा प्रवाह येऊन दिवसभर काम करण्याची शक्ती प्राप्त होते. हल्ली बाजारात लाकडी व स्टीलची देवघरे मुबलक प्रमाणात मिळतात. मात्र, ज्याच्या कृपेने संपूर्ण सृष्टी गतीमान होते. त्या ईश्वराच्या प्रासादासाठी संगमरवरचा वापर केला तर... सुंदर, आकर्षक आणि दिर्घायूषी असे मार्बलचे देवघर कोणाचेही लक्ष वेधून घेतात. हव्या त्या जागेवर, हव्या त्या आकाराचे हे देवघर देवपुजेचे पुरेपूर समाधानही देऊन जातात.

औरंगाबाद येथील 'अंजली मार्बल्स्‌'च्या सोनी परिवाराची चौथी पिढी संगमरवरच्या देवघराची निर्मिती करण्याच्या व्यवसायात आहे. १९६२ पासून त्यांच्या संगमरवरी देवघरांना भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंडसहीत जगभरात मागणी आहे. देवघराच्या स्थापनेपासून त्याच्या विक्रीपर्यंतची अत्यंत शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे. संजय सोनी यांनी या विषयी माहिती दिली. देवघराच्या निर्मितीसाठी मकराना मार्बलचा वापर केला जातो. भारतात नंबर एकचे संगमरवर अशीच याची ओळख आहे. राजस्थानच्या मकराना येथून हा संगमरवर आणला जातो. या मार्बलची केमीकल पॉलिशींग केली जाते. सोबत सिलीकॉन कोटींगही येतेच. यासाठी मार्बलला तब्बल एक हजार वेळेस घासले जाते. यामुळे मार्बलमधील छिद्रे, फटी, भेगांमध्ये 'अंजली'चे खास केमिकल जावून बसते. याचा फायदा म्हणजे देवघराला तेल, हळद-कुंकू आदीचे डाग लागत नाहीत. शिवाय याची चमकही कायम राहते. प्रत्येक देवघरामध्ये लाईट फिटींगसाठी एक होल व हूक दिले जाते. सणा-सुदीच्या काळात तोरण लावण्यासाठी चार वेगळे हुकही देवघरात असतात.

webdunia
PRPR
संगमरवराचे विविध भाग खास 'अंजली'च्या केमिकलने चिकटविले जातात. किमान दहा वर्षे त्यास काहीही होत नसल्याचा दावा संजय सोनी यांनी केला. एवढेही कमी म्हणून की काय, ग्राहकाच्या चुकीने एखादा खांब, कमान, पाय किंवा इतर कोणताही भाग तुटला तरी त्याची मोफत जोडणी करून मिळते. बाहेरगावी विक्री केलेल्या देवघरांसाठी फक्त प्रवासखर्च घेतला जातो. तक्रार येताच कंपनीची व्यक्ती दोन-दिवसांत दुरुस्तीसाठी ग्राहकाच्या घरी पोहचतो.

देवघराची निर्मिती अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. संजय सोनी सांगत होते. संगमरवराची कटिंग अमृतमुहूर्तावर सुरू होते. त्यापूर्वी गोमूत्र व गंगाजलाने जागा पवित्र केली जाते. 'ॐ नमो भगवते, वासुदेवाय नमः' चा अकरा वेळा जप करून संगमरवर कापण्यास सुरूवात होते. प्रत्येक मंदिराखाली स्फटिक लावले जातात. जगात सर्वाधिक ऊर्जा देणारे म्हणून स्फटिकाची ओळख आहे. पूजेतून नसा-नसात उर्जेचा संचार व्हावा म्हणून स्फटिकाचा वापर केला जातो,असे सोनी यांनी सांगितले.


webdunia
PRPR
प्रत्येक देवघरात तांब्याचे स्वस्तिक यंत्र बसविले जाते. या यंत्रावर छोटाशा पिरॅमिडमध्ये झाकलेले मंगळ व मोती लावले जातात. देवघराची निर्मिती करताना घरातील कर्त्या पुरुषाची कुंडली आवश्यक ठरते. त्यावरून चंद्र व नक्षत्रांची माहिती घेतली जाते. हिंदू पंचांगांप्रमाणे एकूण २७ नक्षत्र असतात. कर्त्या पुरुषाचा नक्षत्र साधूनच मंदिराची बांधणी सुरू केली जाते. तो नक्षत्र नाही भेटला तर त्याच्या तीन मित्र नक्षत्रांपैकी एकाचा मुहूर्त साधून बांधणी सुरू होते. बांधणी होऊन देवघर तयार झाले, तेव्हा पुन्हा ग्राहकाच्या घरी पाठवितांना मुहूर्त पाहिला जातो. यात शुभ, लाभ, चंचल, अमृत मुहूर्त बघितले जातात. तयार देवघराला गंगाजल व गोमुत्राने शुद्ध केले जाते. लाल वस्त्रात गुंडाळून त्यास यजमानाच्या घरी पाठविले जाते.

प्रतिष्ठानातून निघतांना उदबत्ती फिरवून व गोत्राचा उच्चार करूनच देवघराची पाठवणी होते. यजमानांच्या घरी गोमुत्राने जागा शुद्ध करून मगच देवघर ठेवले जाते. सोनी म्हणाले, शास्त्र सांगते की मांडी घातल्यावर बेंबीवर देवाची स्थापना व्हावी. देवाची स्थापना 'सवई'मध्ये करण्याची पद्धत आहे. 'सवई' म्हणजे जमिनीपासून सव्वा पाच, सव्वा सहा, सव्वा आठ सेंटीमीटर, उंच असे अंतर .देवघरात देव ठेवण्याची जागा तशीच केलेली असते. मंदिरांमध्येही हा नियम पाळला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. देवघर घरी नेल्यानंतर पुढील दोन महिन्यात कोणत्याही कारणाने तो परत करावा वाटला तरच तशी सोयही उपलब्ध होते. एखाद्यावेळी देवघर आणल्यानंतर काही अनिष्ट घटना घडली, घरात वाईटाला सुरूवात झाली, ब्राह्मण -वास्तुतज्ज्ञ त्यास योग्य मानत नसल्याचे लक्षात आले, तर ग्राहकाचे पूर्ण पैसे परत करतो, असे सोनी यांनी म्हणाले.

webdunia
PRPR
प्रत्येक देवघराच्या विक्रीतून शंभर रुपये गायीच्या चार्‍यासाठी तर दोनशे रुपये साधू-संताच्या अन्नदानासाठी खर्च केले जातात. तयार देवघरांसोबतच ग्राहकांच्या घरी जावून त्यांच्या मागणीनुसार, जागेच्या उपलब्धतेनुसार देवघर तयार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आजकाल 'कस्टम मेड' देवघरांना मोठी मागणी आल्याचे सोनी म्हणाले. मागणी प्रमाणे देवघरांवर २४ कॅरेट गोल्डप्लेटींग, माणिक मोत्याची कलाकुसर व कोरीव कामही केले जाते. बावीसशे रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत देवघरांची मोठी रेंज उपलब्ध आहे. ५० हजार ते १७ लाख रुपयांपर्यंत खास ऑर्डर केलेले, रत्नजडीत देवघरांची रेंज 'अंजली'त पहायला मिळते. देवभक्तीत लीन होण्यासाठी उपयुक्त असे हे देवघर घरातील इंटेरिअरची शोभाही वाढवितात.

आजघडीला भारतासहित कॅनडा, न्यूझीलंड, अमेरिका आदी देशांमध्ये हे देवघर पाठविले जातात. परदेशात पाठविल्या जाणार्‍या देवघरांची बांधणी तेथील यजमानांना करावी लागते. याची माहिती देणारी बहुभाषिक सीडी, रेखाटने व आवश्यक केमिकल्स सोबत पाठविले जातात. भारतात कोठेही देवघर हवे असल्यास वाहतुकीचा खर्च अंजली मार्बल्स्‌ करते. अंजली मार्बल्स्‌च्या चार पिढ्यांनी या व्यवसायात विश्वासार्हता कमावली आहे. देवघरांच्या निर्मितीला केवळ तांत्रिक रुप न देता सोनी परिवाराने त्यास धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान दिले. ईश्वराच्या भक्तीत लीन होण्यासाठी याहून पावन मार्ग कोणता असणार?

Share this Story:

Follow Webdunia marathi