Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'पारंपरिक पद्धतीचा भोंडला'

'पारंपरिक पद्धतीचा भोंडला'

वेबदुनिया

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्‍या दिवशी हागदा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोला म्हणजे शिवशंकर आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असेही नाव आहे. नवरात्रीमध्ये आदिशक्तीची, मातृशक्तीची पूजा केली जाते.

काही ठिकाणी भोंडळा नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला जातो. पूर्वी पाटावर चित्र काढून मध्यभागी पाट ठेवून त्याभोवती तरुण मुली, स्त्रिया फेर धरून गाणी गात असत. ऋग्वेदात श्रीसुक्त आहे. त्यात अधपूर्वी रथमध्यां हस्तीनाद प्रबोधिनीम् म्हणजे जिच्या रथाच्या पुढे घोडे चालत आहेत आणि हत्तींच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व जाणवते अशा देवी लक्ष्मीला मी नमस्कार करतो आणि आवाहन करतो.

देवीच्या पूजनानंतर सर्व स्त्रिया गोलाकार उभ्या राहून फेर धरतात आणि
एलोपा पैलोमा गणेश देवा
माझा खेह मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पाखे घुमती नुरजावरी
अशा गाण्याने भोंडल्याची सुरवात करतात. मग दुसरे गाणे असे करीत अनेक गाणी गायली जातात.

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
असे एखादे गाणे गाऊन सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल गौरावाचे, स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया आनंद साजरा करतात. पूर्वी चूल आणि मूल एवढंच क्षेत्र असणार्‍या स्त्रियांनाहा आश्विन महिना म्हणजे भोंडला हळदीकुंकू वगैरेमुळे विरंगुळा मिळे. मने मोकळी होत असत आणि पुन्हा कामाला नवा उत्साह मिळे. आजही आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा-ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठी आणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी 'पारंपरिक पद्धतीचा भोंडला' नव्या युगात तरुण स्त्रियांनाही आनंद देत असतो आणि म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी भोंडला साजरा होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्न- संस्कार