Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रभूवर प्रेम:

प्रभूवर प्रेम:

सौ. कमल जोशी

मी तुच्छ नाही. मी तर शुद्ध चैतन्यमय परमात्म्याचा अंश आहे.

आजपर्यंन्त संसारिक संबंध खूप जोडलेत. आता परमात्म्याशी प्रेम जोडा. भगवंताशी प्रस्थापित केलेले नाते संसार बंधनातून मुक्त प्रभू आपल्या हृद्‍यात ठाण मांडतो. मग तोच आपल्या उदरनिर्वाहाची काळजी घेतो. आपल्या नात्यातील व्यक्तीला ताप आला तर आपण त्याची चौकशी करतो. त्याप्रमाणे भगवंताशी नाते जोडले की तो आपली चोकशी करतो. आपण श्रीमंताशी मैत्री करतो. त्याच्याशी संबंध जोडतो.

श्रीमंत धन देईल पण शान्ती देणार नाही. शान्ती तर त्या सर्वेश्वराशी संबंध प्रस्थापित केल्याने मिळते. भगवंतावर प्रेम केले की नारायणा मागोमाग लक्ष्मी पण धावत येईल. म्हणून प्रभूच्या अनेक रूपापैकी एक रूपाला इष्टदेवत समजून त्याच्याशी प्रेम संबंध जोडावा. हा प्रेमभाव ईश्वरस्मरण करून देईल आणि त्याच्याशी तन्मयता वाढवेल मग जगाचे विस्मरण होईल व जीवन धन्य हेईल.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi