Article Hinduism Marathi %e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80 107121900008_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भक्ती

दुसर्‍याच्या सुखात सुखी राहाण्यास शिकावे
दुसर्‍याच्या सुखात सुखी राहाण्यास शिकाव

जीवनात भक्तींचा अविष्कार करायचा असेल तर सर्वावर प्रेम करावे आणि ज्ञान संपादन करायचे असेल तर सर्वांचा त्या करावा. सर्वांवर प्रेम करून सर्वाभूती परमेश्वराचे दर्शन घेणार्‍याची भक्ती सफल होते. केळीचे साल निरूपयोगी आहे असे समजून फेकणे ज्ञानमार्ग आहे तर ते उपयोगी समजून प्रेमाणे गाईला खाऊ घालणे भक्ती मार्ग. फेकून दिलेल्या केळाच्या सालीवरून कधी कुणाचा पाय घसरण्याची शक्यता असते पण गाईला प्रेमाने खाऊ घातलेल्या केळाच्या सालीचे रूपांतर गाईच्या दुधात होते. आणि जीवन पोषक बनते.

ज्ञानमार्गात कधीकधी अहंकारामुळे घसरुन पडण्याची शक्यता आहे. भक्तीमार्गात प्रेमच प्रेम. आनंदी आनंद. एक क्षण सुद्धा भगवंताला आपल्या हृदयातून दूर करून नये त्याला हृदयमंदिरात कायमचे बसविण्यात खरी भक्ती आहे.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi