Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्कर्म आणि सद्‍भाव

सत्कर्म आणि सद्‍भाव

सौ. कमल जोशी

ज्ञानी किंवा विद्वान झाल्याने समाधान मिळत नाही ते भक्तीनेच मिळते.

सत्कर्म करताना त्याच्यामागे भाव शुद्ध असावा लागतो. कर्मामागचा भाव जर शुद्ध नसेल तर ते कर्म शुद्ध न रहाता अशुद्ध कर्म होईल. शुद्धभावाने केलेल्या कर्माला यश मिळते. भगवंताच्या पूजेनंतर सर्व विश्वाच्या कल्याणार्थ प्रार्थना केली तर भगवंत प्रसन्न होतो. आपल्या मुलाबाळांचे शुभ चिंतन केल्याने भगवंत नाराज होत नाही पण शत्रूच्या मुलांचे वाईट चिंतले की तो नाराज होतो.

कारण शत्रूची मुलेही भगवंताचीची मुले आहेत. आम्ही त्यांच्याच समोर त्यांच्या मुलांचे वाईट चिंतले तर ते त्याला कसे आवडेल. दक्षाने केलेल्या यज्ञा प्रमाणे वाईट भावाने केलेले कर्म कितीही थोर असो त्याचे फळ शुद्ध नसते.

Share this Story:

Follow Webdunia marathi