भारतीय संस्कृती प्रमाणे जमिनीवर बसून भोजन करणे उत्तम मानले आहे.
वैज्ञानिक कारण: मांडी घालून बसणे एकाप्रकारचा योग आसन आहे. या पोझिशनमध्ये बसण्याने मेंदू शांत राहतं आणि जेवताना मेंदू शांत असेल तर पचन क्रिया चांगली होते. जमिनीवर बसल्याने मेंदूहून आपोआप पोटाला जेवण्यासाठी तयार रहाण्याचं सिग्नल मिळतं. खाली बसून जेवण करताना मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. जमिनीवर बसून जेवल्याने पोट सुटत नाही आणि पोटासंबंधी विकारही होत नाही.