Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहुरंगी खीर

बहुरंगी खीर

डॉ. भारती सुदामे

ND
साहित्य : एक लिटर दूध, अर्धीवाटी बारीक रवा, दोन चमचे मैदा, पाव वाटी खवा, दीड वाटी साखर, पाव वाटी ओले खोबरे, बेदाणे, बदाम, खाण्याचे निरनिराळे रंग.

कृती : रव्यात थोडे तूप घालून रवा व मैदा भाजावा. गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे व खवा घालून अगदी मंद विस्तवावर गोळा होईपर्यंत परतावे. खाली उतरवून, जितके रंग घालावयाचे असतील, तितके शिजविलेल्या गोळ्याचे भाग करून, त्या प्रत्येकात तो तो रंग घालावा. सर्व भाग वेगवेगळे चांगले मळून घ्यावेत. नंतर तुपाचा हात लावून, प्रत्येक रंगाच्या गोळ्याच्या चण्याएवढ्या बारीक बारीक गोळ्या तयार करून, त्या हाताने घट्ट वळून ठेवाव्यात. गोळ्या सैल झाल्यास त्या दुधात घातल्यावर फुटण्याचा संभव आहे.

दूध आटवूनते पाऊण लिटर करावे. त्याला थोडे कॉर्नफ्लोअर लावून दाटपणा आणावा. नंतर राहिलेली साखर, बेदाणे, बदामाचे काप व वरील निरनिराळ्या रंगाच्या गोळ्या उकळत्या दुधात घालून उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi