विसरून जाऊ मतभेद,असं लोकं म्हणतात,
होळीचा आनंद सर्वचजण मनमुराद घेतात,
पण खरंच विसरतात का मतभेद मनापासून,
पुनश्च तसंच वागतात, दुसऱ्या दिवसापासून,
खऱ्या अर्थानं, रंगा पासून काही शिकायला हवंय,
एकमेकांत मिसळून जगणं शिकाता यायला हवंय,
मिसळलं न की मग तयार होतो रंग नवा,
आपलंपण जपून सुद्धा, नवा रंग तयार व्हायला हवा,
हेचं तर शकवतो न हा सण आपल्यास,
रंग आहे तर अर्थ येतो न जीवनास!
....अश्विनी थत्ते.