यंदा सुमारे 500 वर्षांनंतर होळीवर असे विशेष योग बनत आहे...जाणून घ्या विस्तृत माहिती....
Holi 2021 Date : यंदा होळी 28 मार्च 2021 रोजी फाल्गुन पौर्णिमेला आहे. धूलिवंदन 29 मार्च 2021 रोजी आहे. या दिवशी अत्यंत शुभ ध्रुव योग निर्मित होत आहे.
सोबतच 499 वर्षांनंतर यंदा होळीच्या दिवशी विशेष दुर्मिळ योग बनत आहे. हा योग आधी 03 मार्च 1521 रोजी निर्मित झाला होता.
29 मार्च ला चंद्र, कन्या राशी विराजित राहतील. गुरु आणि शनि ग्रह आपल्या राशीत असतील. यापूर्वी या दोन्ही ग्रहांचे या प्रकारे संयोग 3 मार्च 1521 साली बघण्यात
आले होते. गुरुची राशी धनू आणि तर शनीची राशी मकर आहे. दशकांनंतर होळीला सूर्य, ब्रह्मा आणि अर्यमाची साक्ष राहील. हा दुसरा विशेष दुर्मिळ योग आहे.
वर्ष 2021 ची होळी सर्वार्थसिद्धि योग यात साजरी होणार. सोबतच या दिवशी अमृतसिद्धी योग देखील असेल.
काय आहे होलाष्टक (Holashtak)
हिंदू धर्मानुसार होळीच्या 8 दिवसांपूर्वी होलाष्टक लागतं. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. याच कारणांमुळे या दरम्यान लग्न, गृहप्रवेश किंवा इतर
मांगलिक कार्य केले जाते नाही.
होलाष्टक तिथी (Holashtak Date)
होलाष्टक आरंभ तिथी: 21- 22 मार्च पासून (मत मतांतर)
होलाष्टक समाप्ति तिथी: 28 मार्च पर्यंत
होलिका दहन तिथी (Holika Dahan Muhurat)
होलिका दहन रविवार, 28 मार्च 2021
होलिका दहन मुहूर्त: 18 वाजून 37 मिनिटांपासून ते 20 वाजून 56 मिनिटांपर्यंत
कुल अवधि: 02 घंटे 20 मिनट की
होळी 2021 तिथी आणि शुभ मुहूर्त
पौर्णिमा तिथी प्रारम्भ: मार्च 28, 2021 रोजी 03:27 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त: मार्च 29, 2021 रोजी 00:17 वाजता