होळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. होळीच्या सणाला मुलांचा उत्साह दाणगा असतो. या उत्साहात मुलं असे काही करतात मुळे त्यांना त्रास होतो. मुलं होळी खेळताना या गोष्टीची काळजी घ्यावी.
1 मुलांना घरा बाहेर पाठवू नका- मुलांना एकटे बाहेर खेळायला पाठवू नका. अनोळखी माणसांसह होळी खेळू देऊ नका. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या मुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका.
2 पाण्याने होळी खेळू देऊ नका- मुलांना पाण्याने होळी खेळणे आवडते ,परंतु मुलांना पाण्याने होळी खेळण्याऐवजी कोरड्या रंगाने होळी खेळायला सांगा .
3 सेफ्टी ऍक्सेसरीज घालून पाठवा- मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने डोक्यावर कॅप आणि चष्मा लावून पाठवा जेणे करून रंग त्यांच्या डोळ्यात जाणार नाही. त्यांना पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून पाठवा जेणे करून रासायनिक रंगाचा त्यांच्या त्वचेवर काही परिणाम होणार नाही.
4 भांडणे होऊ देऊ नका- बऱ्याच वेळा मुलांना हे समजत नाही की कोणावर रंग टाकायचे आणि कोणावर नाही. अशा परिस्थितीत काही लोक असे ही असतात ज्यांना रंग खेळायला आवडत नाही आणि त्यांच्यावर रंग टाकल्यावर ते भांडायला येतात. मुलांना सांगून आणि समजवून ठेवा की ओळखीच्यांवरच रंग टाका. असं करून आपण भांडण होण्याला टाळू शकाल.
5 मुलांच्या खाण्या-पिण्याचे लक्ष ठेवा- मुलं होळीत अति उत्साही असतात. आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा मुलांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा त्यांची पोट बिघडू शकतात