How many types of Holi : फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या दिअवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवसांमध्ये रंग खेळण्यासोबतच पकोडे आणि थंडाईचा आस्वाद घेतला जातो. तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळी साजरी करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. चला जाणून घेऊ या किती आणि कोणत्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.
1. धुळवड : अनेक ठिकाणी लोक एकमेकांना चिखल, माती लावतात यालाच धूलिवंदन म्हणतात. धूलिवंदन हे होळीच्या दुसऱ्या खेळले जाते. अजून पण हुड़दंगी लोक हे कार्य करण्यापासून वंचित राहत नाही.
2. लड्डूफेंक होळी : होलाष्टक जेव्हा प्रारंभ होते म्हणजे अष्टमीच्या दिवशी बरसानेचा एक-एक व्यक्ती ज्याला पंडा असे म्हणतात, तो नंदगांव जावून होळी खेळण्याचे निमंत्रण देतो आणि जेव्हा पुन्हा श्रीजी मंदिर परततो तेव्हा त्याच्या स्वागतमध्ये लड्डूफेंक होळी खेळतात. मंदिर प्रांगणमध्ये भक्त एकमेकांवर लाडू फेकून होळी साजरी करतात. शंभर किलो लाडूंन सोबत बरसानाच्या लाडली मंदिरमध्ये गुलाल उडवून होळी खेळली जाते.
3. लाठीमार होळी : ब्रजमंडलमध्ये खासकरून बरसानामध्ये लाठीमार होळी खेळली जाते. इथे महिला परुषांना लाठी मारतात आणि पुरुषांना यांपासून स्वताला वाचवायचे असते. राधारानी मंदिर दर्शन केल्यानंतर लाठीमार होळी खेळण्यासाठी रंगीली गल्ली चौक मध्ये सर्व जमा होतात. या दिवशी कृष्णचे गांव नंदगांवचे पुरुष बरसानेमध्ये स्थित राधाचे मंदिरावर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करतात. पण बरसानेच्या महिला एकत्रित येऊन त्यांना लाठिने मारण्याचा प्रयत्न करतात .
4. होरी गीत : राधा कृष्णच्या वार्तालापवर आधारित बरसाने मध्ये या दिवशी होळी खेळण्याबरोबर एक लोकगीत देखील गाईले जाते यादिवशी लोक एकमेकांची गळा भेट घेतात. तसेच मिठाई वाटतात. भांगचे सेवन करतात. नृत्य करतात, या दिवशी प्रत्येक व्यक्ती रंगाने पूर्णपणे माखलेला असतो.
5. गोविंद होळी : महाराष्ट्रमध्ये गोविंदा होळी अर्थात मटकी-फोड़ होळी खेळली जाते. या दरम्यान रंगोत्सव चालत राहतो.
6. तमिल होळी : तामिळनाडूमध्ये लोक होळीला कामदेवला बलिदान रूपमध्ये आठवण करतात. याकरिता इथे होळीला कमान पंडिगई, कामाविलास आणि कामा-दाहानाम म्हणतात. कर्नाटकमध्ये होळीच्या पर्वावर कामना हब्बाच्या रूपमध्ये साजरी करतात. आंध्र प्रदेश, तेलंगनामध्ये अशीच होळी साजरी होते.
7. आदिवासींची होळी : आदिवासी क्षेत्रमध्ये होळीसोबत ताड़ी आणि डांस जोडलेला असतो. आदिवासींच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्र मध्ये होळीचा रंग पण वेगवेगळा असतो. जसेकि झाबुआ मध्ये होळीच्या पूर्व भगोरिया उत्सव आणि मेळा प्रारंभ होतो. होळी पर्वावर खूप जल्लोष असतो.
8. रासलीला : होळीच्या दिवशी श्रीकृष्णाने पूतनाचा वध केला होता आणि या आनंदमध्ये गावातील लोकांनी रंगोत्सव साजरा केला होता. हे देखील बोलले जाते की श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रासलीला खेळली होती आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याचा उत्सव साजरा केला जायचा. संस्कृत साहित्यमध्ये होळीचे अनेक रूप आहे. ज्यामध्ये श्रीमद्भागवत महापुराण मध्ये होळीला रासचे वर्णन केले गेले आहे. महाकवि सूरदास यांनी वसन्त आणि होळी वर 78 पद लिहले आहे.
9. होळी नृत्य आणि संगीत : शास्त्रीय संगीताचा आणि होळीचा दीर्घ संबंध आहे. ध्रुपद, धमार आणि ठुमरी शिवाय आज पण होळी अपूर्ण आहे. होळी नृत्य, संगीत आणि गीताचे खास महत्व आहे. अनेक लोक ठंडाई, नृत्य आणि गाणे यांचे आयोजन करतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik