होळीवर काळी हळदीचे उपाय अत्यंत प्रचलित आहेत.
1- कुटुंबातील एखादा सदस्य सतत अस्वस्थ राहत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी कणकेच्या 2 लाट्या तयार करून त्यात गूळ, चण्याची डाळ आणि वाटलेली काळी हळद दाबून आजारी व्यक्तीवरून सात वेळा ओवाळून नंतर गायीला खाऊ घालून द्या. होळी नंतर तीन गुरुवार हा उपाय केल्याने आरोग्यात बदल जाणवेल.
2- अनेकदा आपण वारंवार आजारी का पडत आहात हे कळतच नाही. अनेकदा यश हाती लागणार असं वाटत असताना अपयश दिसू लागतं, सर्व गुण संपन्न असून देखील विवाहाचे योग जुळून येत नाही किंवा धनासंबंधी काही अडचणी समोर येत असल्यास हा उपाय करून बघावा. काळी हळद काळ्या कपड्यात गुंडाळून सात वेळा स्वत:वरुन ओवाळून होळीच्या अग्नीत भस्म करावे.
3- पैसा येतो परंतू टिकत नाही तर हा उपाय अमलात आणावा. होलिका दहनाच्या दिवशी चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर व शेंदूर ठेवून होळी पूजन केल्यानंतर डबीसह होळीच्या 7 प्रदक्षिणा घालाव्या नंतर डबी तेथे स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावी. धनासंबंधी समस्या दूर होईल.