Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rangpanchmi 2024: रंग खेळण्यापूर्वी केसांना करा तयार, घ्या काळजी

Holi Colours Side Effects
, शुक्रवार, 29 मार्च 2024 (17:54 IST)
होळी, रंगपंचमी हे सण सर्व लोक उत्साहात साजरा करतात. बाजारात तसेच घरात सर्व ठिकाणी लोक आनंदाने रंग खेळतात. रंग खेळतांना तुम्हाला तुमच्या केसांची खास काळजी घ्यायची आहे. 
 
केसांना रंग लागल्यावर अनेकांचे केस गळायला लागतात. तसेच केस रुक्ष-कोरडे होतात. जर तुम्ही केसांची चांगली काळजी घेतली तर केसांना रंग चिटकणार नाही. रंगपंची येण्यापूर्वी केसांना चांगल्या प्रकारे तयार करा, तुम्हाला समस्या निर्माण होणार नाही. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी केस धुवून केसांना कंडीशनर करा. जर तुम्हाला केस धुवायचे नसतील तर केसांना चांगल्या प्रकारे हेयर सीरम लावा. यामुळे तुमच्या केसांवर एक लेयर तयार होईल. ज्यामुळे केस रंगांपासून सुरक्षित राहतील. तसेच रंग खेळण्यापूर्वी केसांना तेलची मॉलिश नक्की करा रंग खेळतांना तेलाची लेयर ही रंगांना केसांपासून दूर ठेवेल. जर तुम्ही घरीच रंग खेळत असाल तर केसांसाठी हेयर मास्कचा उपयोग करू शकतात. याकरिता एरंडलच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून केसांना योग्य पद्धतीने लावा. यामुळे केस रंगांपासून सुरक्षित राहतील. जर तुमचे केस लांब असतील तर, केसांना मोकळे सोडून रंग खेळू नका. रंग खेळण्यापूर्वी केसांना बांधून घ्या. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी पारंपारिक रहाडी सज्ज