Article Holi %e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%89%e0%a4%a7%e0%a4%b3%e0%a4%a3 109030900082_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिनेगितामधील रंगाची उधळण...

सिनेगितामधील रंगाची उधळण
NDND
सप्तरंगानी न्हाऊन निघालेल्या होळीचा आंनद मनमुलाद लुटण्यात रूपेरी पडद्यावर रंगलेले चित्रपट आपण कधीच विसरू शकत नाही. ''रंग बरसे भीगे चुनर वाली....रंग बरसे'' तर कधी ''होली आई रे कन्हाई'' अशा सिनेगीताच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर नायक- नायिका रंगाची उधळण करत आले आहेत...

हिंदी चित्रपट रंगीत झाल्यानंतर खर्‍या अर्थाने पांढर्‍या पडद्याला रूपेरी रंग चढला. तेव्हापासून चित्रपटात होळीच्या रंगाचे प्रसंग अधिक रंगवण्यात येऊ लागले. होळी गीते प्रेक्षकामध्ये अधिक लोकप्रिय झाली. कृष्‍णधवल पडद्याची जागा रूपेरी पडद्याने घेतल्याने गुलाबी, निळा, जांभळा, पिवळा, लाल रंग अधिक खूलून दिसायला लागले.

बॉलीवूडमधल काही चित्रपट जुनी झालीत परंतु त्यातील गीते अजून ही नवी आहेत. जशी होळी येण्याची चाहूल लागली की, गल्लीबोळातून 'रंग बरसे भिगे चूनर वाली' अशी अनेक होळी ‍गीते ऐकू येतात.

काही चित्रपट दिग्दर्शकानी आपल्या चित्रपटात होळीचे चित्रपट सहभागी करून घेते आहे. कारण काय तर प्रेक्षक त्याला अधिक पसंती देतात. या चित्रपट निर्मात्यामध्ये यश चोप्रा यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. त्यानी 'सिलसिला', 'मशाल', 'डर' 'मोहब्बतें' आदी चित्रपटातून होळीचे प्रसंग व गीते देखवून प्रेक्षकाना इतके रंगून टाकले आहे की तो रंग अजूनही फिका झालेला नाही.
webdunia
NDND


'सिलसिला' या चित्रपटातील 'रंग बरसे भीगे चुनर वाली' या गीताला रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता मिळाली. या गीताशिवाय होळी हा सण पूर्णच होऊ शकत नाही. अमिताभ बच्चन व रेखा या कलाकरानी अप्रतिम अभिनय केला. अमिताभच्या पत्नीच्या भूमिकेत असलेली जया बच्चन व रेखाच्या पतीच्या भूमीकेत असलेला संजीवकुमार लाचार होऊन त्या दोघांची मदमस्ती पाहून दंग राहून जातात.

अमिताभ एकदा पुन्हा 'बागवान'मध्ये 'होली खेले रघुविरा..' या होळीच्या गीतावर थिरकताना प्रेक्षकाना दिसला. त्यात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत हेमा मालिनी, त्याची मुले व मित्रानी खूप मस्ती केल्याचे दाखवले आहे.

शोले या सुप्रसिद्ध चित्रपटातही होळीचे गीत दाखवले आहे. त्यात धर्मेद्र व हेमा मालिनी यांना रंग खेळताना दाखवले आहे. धर्मेंद्र अनेक चित्रपटात होळी गीतात दिसला 'राजपूत' मध्ये 'भागी रे भागी ब्रजबाला...', 'फागुन' या चित्रपटात 'पिया संग खेलो होली फागुन आयो रे... आदी गीते आजच्या पॉप संगीताच्या युगात धूम करत आहे.

राजेश खन्ना ही अनेक चित्रपटामध्ये होळी गीतमध्ये रंग खेळताना दिसला आहे. 'आपकी कसम'मध्ये 'जय जय शिव शंकर....', 'कटी पतंग'मध्ये 'आज न छोड़ेंगे बस हमजोली...', 'सौतन'मधील 'जुल्म तुमने कर डाला...' आदी गीतेही लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटात होळी गीताची मालिका सुरवातीपासून सुरू झाली आहे. त्यात 'कच्चे धागे'मधील 'अब के बरस रंग...', 'कोहिनूर'चे 'तन रंग लो जी मन रंग...', 'धनवान'मधील 'मारो भर भर के पिचकारी', 'कामचोर'मधील 'मल दे गुलाल मोहे...', 'गाइड'मध्ये 'होली आई होली आई..., 'गोदान'चे 'होली खेलत नंदलाल बिरज...' 'फूल और पत्थर'चे 'होली के दिन लायी है...' आदी गीते आजही जिंवत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi