Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कैफची बहीण कॅनेडियन चित्रपटात

कैफची बहीण कॅनेडियन चित्रपटात
, सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:09 IST)
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल लवकरच 'डॉ. कॅबी' या कॅनेडियन चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात इसाबेलसह कॅनेडियन अभिनेता विनय विरमानी आणि ब्रिटिश-इंडियन अभिनेता कुणाल नायर झळकणार आहे. चित्रपटात इसाबेल कुणाल नायरसह रोमान्स करताना दिसणार आहे. 'डॉ. कॅबी'मध्ये इसाबेलचा एक आयटम नंबरसुद्धा असणार आहे. हा डान्स नंबर कतरिनाच्या गाजलेल्या 'शीला की जवानी'सारखा असल्याची चर्चा आहे. कतरिना आपल्या बहिणीच्या डेब्यू चित्रपटावर लक्ष देऊन आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना सतत इसाबेलच्या भूमिकेविषयी आणि प्रदर्शनाबाबत विचारत असते. जेव्हा तिला इसाबेलच्या 'दाल मखनी' या गाण्याविषयी कळले, तेव्हा तिने आपल्या लाडक्या बहिणीचा डान्ससुद्धा बघितला. एका अश्लील एमएमएसमुळे इसाबेल अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. इसाबेलच्या चेहर्‍याशी साधम्र्य साधणारी मुलगी या एमएमएसमध्ये दिसत होती. अद्याप ती मुलगी इसाबेलच होती की दुसरी कुणी हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. इसाबेलला एकूण ८ बहीण-भावंडं आहेत. कतरिना, हबीबा, इशेल, एनीला, आयशा आणि मारिया ही तिच्या बहिणींची नावे आहेत. तर मायकल हे तिच्या भावाचे नाव आहे. तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आणि आईचे नाव सुझान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi