Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेनिफर घटली 25 किलोनं

जेनिफर घटली 25 किलोनं

वेबदुनिया

WD
जेनिफर गार्नर या अभिनेत्रीनं तिच्या आगामी सिनेमासाठी 25 किलो वजन कमी केलंय. सॅम्युएल या मुलाला जन्म दिल्यानंतर, गरोदरपणादरम्यान वाढलेलं वजन तिनं ‘डल्लास बायर्स क्लब’ या सिनेमासाठी कमी केलंय. मॅथ्यू मॅककने आणि जॅरेड लेटो या सहकलाकारांपुढे मी अगदीच जाडी दिसेन, ही भीती मला होती.

त्यामुळे मी बारीक होण्याचा निर्णय तातडीनं घेतल्याचं 41 वर्षाच्या जेनिफर गार्नरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मुलांच्या बाबतीत अगदी सहज असं म्हटलं जातं, की त्यांनी 13 किलो वाढवले, 10 किलोनं तो कमी झाला; पण मलाही मी वजन सहज कमी करू शकेन हा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी आगामी सिनेमासाठी जवळपास 25 किलोनं घटले आहे. मॅककने 185 पाउंडवरून स्वत:चं वजन 135 पाउंडवर आणलं. त्यांनी हे अजिबातच न खाऊन जमवून आणलं. जॅरेड तर जवळपास हवा भरलेल्या फुग्यासारखा दिसू लागला होता.

मी मात्र, खाण्या-पिण्याविषयी अतिशय कडक बंधनं न पाळता व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं बारीक झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi