व्हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने आपले आलिशान घर विकायला काढले आहे. या घराची किंमत तब्बल तीन कोटी 70 लाख पाऊंड इतकी आहे. या घरात सात बेडरूम, नऊ बाथरूम, एक वाचनालय असून, हजारो एकरावर पसरलेल्या राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी या घरातून थेट मार्ग आहे.
अमेरिकेत अनेक ठिकाणी मालमत्ता असलेल्या या 52 वर्षीय अभिनेत्याने स्थानिक दगडाच्या माध्यमातून साकारलेले हे भव्य घर स्वत:साठी बनवून घेतले होते. 2006 मध्ये टॉम क्रुझ आणि त्याची पत्नी केट होल्मसने या आलिशान घरात माध्यमांसाठी त्यांची मुलगी ‘सुरी’च्या फोटोसेशनचे एका भव्य कार्यक्रमाद्वारे आयोजन केले होते.