Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायकल जॅक्सनची १६ वर्षांची मुलगी गरोदर!

मायकल जॅक्सनची १६ वर्षांची मुलगी गरोदर!
, बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (17:04 IST)
सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे की, दिवंगत मायकल जॅक्सनची मुलगी पेरिस जॅक्सन गरोदर आहे. एका वेबसाइटनुसार, १६ वर्षीय पेरिसला तिच्या प्रियकरासह एका रेस्तराँमध्ये पाहिले गेले आहे. तिथे ती मद्यपान करण्याऐवजी सतत पाणी पिताना दिसली. पेरिस जॅक्सनचा जन्म ३ एप्रिल १९९८ रोजी झाला. पेरिसच्या आईचे नाव डेबी रो आहे; परंतु मायकलने तिचे संगोपन केले होते. १९९९ मध्ये डेबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मायकलला मुलीची कस्टडी मिळाली होती. तिला एक मोठा भाऊदेखील आहे. २00९ मध्ये मायकलचा मृत्यू झाला, त्यानंतर पेरिस आणि तिच्या भावाची कस्टडी मायकलची आई कॅथरिनला मिळाली होती. पेरिस काही टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. जून २0१३ मध्ये तिने हात कापून काही अमली पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे प्रकरण ड्रग्ज ओव्हरडोस सांगून मिटवण्यात आले होते. पेरिसच्या गरोदरपणामध्ये किती सत्यता आहे याचे स्पष्टीकरण अद्यापि झालेले नाहीये.

Share this Story:

Follow Webdunia marathi