विवस्त्र होऊन गायल्यास आवाजात येतो गोडवा - लेडी गागा
पॉप स्टार लेडी गागाने आपल्यान नवीन अल्बममध्ये विवस्त्र होऊन गाण्याचा निर्णय घेतला असून, असे केल्याने आवाजात गोडवा येतो, असे गागाचे म्हणणे आहे. 26 वर्षीय पॉप स्टार लेडी गागा सध्या 'आर्ट पॉप' साठी काम करीत आहे. 2011 साली आलेल्या 'बॉर्न दिस वे' नंतर येणारा गागाचा हा तिसरा स्टुडिओ अल्बम आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लेडी गागाच्या मते, विवस्त्र होऊन गायल्यामुळे तिचा आवाज चांगला होतो. अलीकडच्या काळातच लेडी गागाने ट्विटरवर स्वत:चा एक न्यूड फोटो अपलोड केला होता. शिवाय 'व्होग' मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या एडिशनसाठी गागाने सेमी न्यूड फोटोशूटही केले आहे.