सर्वाधिक तिरस्करणीय 'सेलीब्रेटी' ठरलेली ग्वायनीत पाल्ट्रोची पीपल्स मॅगझिनने जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवड केली. ख्रिस मार्टीन या दोन मुलांच्या बापासोबत लग्न करणारी पाल्ट्रोने गायिका बियांन्सी नॉवेल्सला धक्का देत यंदा जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून बाजी मारली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ऑस्कर विजेती पाल्ट्रो आजपर्यंत चारवेळा जगातील सर्वात सुंदर महिला निवडल्या गेली आहे.