भारतीय तबला वादक संदीप दास याला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीपच्या सिंग मी होम या अल्बमला पुरस्कार मिळाला आहे. यो यो मा, सिल्क रोड एन्सेम्बल, लिस लुईशनर आणि संदीप यांनी मिळून हा अल्बम तयार केला होता. संदीपला ज्या विभागात पुरस्कार मिळाला त्याच विभागात भारतीय सतार वादक अनुष्का शंकर हिच्या लॅण्ड ऑफ गोल्डला नामांकन मिळाले होते. मात्र, अनुष्काला सहाव्यांदा या पुरस्काराने हुलकावणी दिली. आतापर्यंत विविध विभागांमध्ये नामांकन मिळूनही अनुष्का सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावण्यास अपयशी ठरली. यो यो माच्या सिंग मी होम मधील गाणी जगातील विविध कलाकारांनी संगीतबद्ध केलेली आहेत. सतत घर बदलण्याच्या कल्पनेचे या अल्बममध्ये विश्लेषण करण्यात आलेले आहे. हा अल्बम द म्युझिक ऑफ स्ट्रेन्जर्स : यो यो मा अॅण्ड द सिल्क रोड एन्सेम्बल या डॉक्युमेण्ट्रीवर आधारित आहे.