Article Hollywood Marathi %e0%a4%86%e0%a4%89%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%81%e0%a4%a1%e0%a4%b0 %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f 109012700070_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आउटलँडर : एक्शन चित्रपट

आउटलँडर  एक्शन चित्रपट
WD
एक्शन चित्रपटरसिकांसाठी 'आउटलँडर' हा हॉलिवूड चित्रपट भारतात 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. 'लॉर्ड ऑफ रिंग्स ट्रॉयोलॉजी' च्या बरी आस्बॉर्न यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हॉवर्ड मकॅन यांनी दिग्दर्शन केले आहे.

'अंडरवर्ल्ड : राइझ ऑफ द लिकान्स' सारखाच हा चित्रपट आहे. 'आउटलँडर' साठी खासकरून चित्रित करण्यात आलेले 580 व्हिज्युअल इफेक्ट्स प्रेक्षकांना आकर्षित करणार आहेत.

मानवी चेहरा असणारा कैनान हा परग्रहवासी आहे. त्याच्या अवकाश यानाला अपघात होतो आणि यान कोसळते. कान हा स्थानिक लढवय्या त्याला आपल्या ताब्यात घेतो. कैनान त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वीवर आपण एकटेच आलो नसल्याचे सांगून कैनान त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही.

webdunia
WD
कैनानशी संघर्ष करताना तो आपल्याबरोबर अनेक संकटे घेऊन आल्याचे लोकांच्या लक्षात येते. त्याला संपविण्यासाठी सगळेजण एकजूट होतात पण, त्याला संपविणे सहजासहजी शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात येते आणि हा लढा सुरू होतो.

या चित्रपटातील लोकेशन्स पाहण्यासारखी आहेत. कॅनडाच्या उत्तरेकडील न्यूफाउंडलॅड आणि नोवा स्कॉटियामध्ये शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदीमध्ये हा 'कुरुक्षेत्र' या नावाने प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जीम केवीजेल, रॉन पर्लमॅन, जॉन हर्ट, सोफिया माइल्स यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi