Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणि मॅडोनाचा पाय घसरला

आणि मॅडोनाचा पाय घसरला

वेबदुनिया

WD
नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय.. होय, तिनं घातलेल्या उंच टाचांच्या सॅन्डलमुळे तिच्यावर सर्वादेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.

मॅडोना ही कायम चर्चेत राहण्यासाठी काहीतरी विचित्र पेहराव करत असते. यावेळी ती एका अत्यंत पॉश अशा ‘पोश स्की रिसॉर्ट’मध्ये गेली होती. नेहमीप्रमाणे यावेळीही तिने गरजेपेक्षा उंच चप्पल घातली होती.. आणि हॉटेलमध्ये एका उतार असलेल्या ठिकाणी तिच्या उंच टाचांच्या चपलेने तिला दगा दिला.. त्यामुळे ती घसरत खाली घरंगळत गेली.. आणि सर्वादेखत तोंडावर पडली. या दुर्घटनेत तिच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे. या आधीही केली ओसबोरने ही अभिनेत्रीही उंच टाचांच्या चपलेमुळे सर्वासमोर घसरून पडली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi