Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्करसाठी नामांकित चित्रपट

ऑस्करसाठी नामांकित चित्रपट

वेबदुनिया

85व्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांची घोषरा 24 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीची नामांकने घोषित झालेली आहेत आणि या सर्वच चित्रपटांमध्ये तीव्र चुरस आहे. उत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन झालेल्या या चित्रपटांची माहिती....

आर्गो


'गॉन बेबी गॉन' आणि 'द टाऊन' यासारखे उत्तम चित्रपट बनवणार्‍या दिग्दर्शक बेन एफलेक यांनी 'आर्गो' बनवला आहे. 1979मध्ये इराणच्या तेहरान येथील अमेरिकन दूतावासावर अतिरेक्यांनी हल्ला करून 52 अमेरिकन लोकांना ओलिस ठेवले होते. त्यांच्या तावडीतून सहाजण पळून जाण्यात यशस्वी ठरले व त्यांनी कॅनडाच्या दूतावासात आश्रय घेतला. या सहाजणांनी इराणमधून पळून जाण्याची योजना आखली. ही योजना त्यांनी कशी अमलात आणली याचे चित्रण या चित्रपटात आहे.

ऑस्करसाठी नामांकने : सात (बेस्ट चित्रपट, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅडाप्टेड सक्रीनप्ले, फिल्म एडिटिंग, बेस्ट साऊंड एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, बेस्ट ओरिजनल स्कोअर).

PR


झिरो डार्क थर्टी

अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक चित्रपट याविषयावर बनले. कॅथरिन बिगेलोचा 'झिरो डार्क थर्टी' हा चित्रपट हल्ल्यानंतर लादेनची स्थिती काय झाली हे दर्शवणारा आहे. सीआयए एजंट असलेली माया अल्-कायदाचा म्होरक्या असलेल्या लादेनला कोणत्याही परिस्थितीत शोधण्याचा विडा उचलते. पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये त्याचा छडा लागताच ‍दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या घरावर हल्ला केला जातो. त्या रात्री काय काय घडले याचे चित्रट यात आहे. मायाच्या भूमिकेत जेसिका चॅस्टियन हीन तगडा अभिनय केला आहे.

दिग्दर्शक : कॅथरिन बिगेलो. ऑस्करसाठी नामांक : पाच (बेस्ट पिक्चर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट रायटिंग-ओरिनिनल स्क्रीन प्ले, बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग).

webdunia
PR

लिंकन

अमेरिकेनेच सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या आयुष्यातील शेवटच्या चार महिन्यांवर आधारित असा हा चित्रपट. हा एक बॉयोपिक चित्रपट असून त्यात लिंकन सिव्हील वॉरच्या आधी असलेली गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ताणतणावाच्या दृश्यांनी भरलेल्या या चित्रपटात लिंकनच्या भ‍ूमिकेत डॅनियल डे ले‍व्हीस यांनी जान ओतली आहे.

दिग्दर्शक : स्टीव्हन स्लिपबर्ग, ऑस्कर नामांकने : बारा (बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्यर, बेस्ट अ‍ॅडाप्टेड स्क्रीन प्ले, बेस्ट ओरिजिनल स्कोअर, बेस्ट साऊंड मिक्सिंग, बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट कॉश्चुम डिझाईन, बेस्ट फिल्म एडिटिंग).

webdunia
PR



लेस मिझरेबल्स

हा एक ब्रिटिश म्युझिकल ड्रामा आहे. तो व्हिक्यर ह्युगोच्या 1862 मधील एका फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. आदर्श, प्रेम, ममता आणि त्याग यांची कहानी यात आहे. मोठे सेट्‍स आणि सुंदर पोशाख हे या चित्रपटाचे वैशिष्टय. रॉक ऑपेरा शैलीत एक हृदयस्पर्शी कहानी यामधून सांगण्यात आली आहे. ह्यू जॅकमनने या चित्रपटासाठी आपले वजन आधी पंधरा पौंडाने कमी केले व नंतर 30 पौंडाने वाढवले.

दिग्दर्शक : टॉम हुपर, ऑस्करसाठी नामांकने : आठ (बेस्ट पिक्चर, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट ओरिजिनल साँग, बेस्ट काश्चुम डिझाईन, बेस्ट मेकअप अँड हेअरस्टाईल, बेस्ट साऊंड मिक्सिंग, बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन.

webdunia
PR

लाईफ ऑफ पाय

या मार्टल यांच्या 2001मधईल 'लाईफ ऑफ पाय' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. पाय आपल्या मातापित्यांबरोबर पाँडेचेरी राहतो व त्याचे कुटुंब कॅनडात स्थलांतर करण्याचे ठरतवे. जहाजातून त्यांनी सफर सुरू होते आणि एका भयानक वादळात त्याचे कुटुंब नष्ट होते. लाईफबोटीवर केवळ पाय आणि एक वाघ राहतो. पाय अनेक मार्गाने स्वत:चे वाघापासून संरक्षण करतो. थ्रीडी तंत्रज्ञानाने यात स्पेशल इफेक्टस अधिकच चांगले झाले आहेत. ‍

दिग्दर्शक : अँग ली., ऑक्सर नामांकने : अकरा (बेस्ट पिक्चर, बेस्ट अ‍ॅचिव्हमेंट इन डायरेक्टिंग, बेस्ट अ‍ॅडाप्टेड सक्रीनपलने, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन, बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट साऊंड मिक्सिंग, बेस्ट व्हीज्यूअल इफेक्ट्‍स, बेस्ट ओरिजिनल स्कोअर, बेस्ट ओरिजिनल साँग).

webdunia
PR

सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबूग

मॅथ्यू क्विक याचा याच नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट. मेंटल इन्स्टिट्यूशनमध्ये काही काळ घालवल्यानंतर पेट सोलिटानो आपल्या घरी परततो आणि घटस्फोटित पत्नीशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी त्याची भेय एका रहस्यमयी तरुणी टिफनीशी होते. जिच्या स्वत:च्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढतात.

दिग्दर्शक : डेव्हिड ओ. रसेल. ऑस्कर नामांकने : आठ (बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्ले, बेस्ट फिल्म एडिटिंग).
webdunia
PR


अमोर

हा एक फ्रेंच चित्रपट आहे. 'अमोर' या फ्रेंच शब्दाचा अर्थ 'प्रेम' असा आहे. या चित्रपटात एका वृद्ध दांपत्याचे प्रेम चित्रीत करण्यात आले आहे. जॉर्ज आणि अ‍ॅनीचे वय ऐंशीच्या वर आहे. दोघे निवृत्त संगीत शिक्षक आहेत. त्यांची एक कन्या आहे जी आपल्या कुटुंबासह विदेशात राहते. आपल्या आजारी पत्नीची काळजी घेणार्‍या पतीचे व दोघांमधील भावसंबंधाचे चित्रण या चित्रपटात आहे.

दिग्दर्शक : मायकल हेंके, ऑस्कर नामांकन : पाच (बेस्ट पिक्चर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले, बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म).

webdunia
PR

बीस्ट ऑफ सदर्न वाईल्ड

यामधील क्युवेनजहेन वालिसचे वय नऊ वर्षे आहे आणि तिला उत्कृष्ट अभिनेत्रीच्या विभागात ऑस्कर नामांकन मिळाले आहे. हा एक अमेरिकन फॅन्टेसी ड्रामा आहे. हुशपप्पी नावाची मुलगी आणि तिच्या अस्वस्थ, रागीट पित्याची ही कहानी आहे. त्यांचा सामना एका वादळाशी होतो. पित्याची खराब स्थिती पाहून ‍हुशपप्पी आपल्या आईच्या शोधात बाहेर पडते.

दिग्दर्शक : बेन जीतलिन, ऑस्कर नामांकन : चार (बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट अ‍ॅडाप्टेड स्क्रीनप्ले, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस).

webdunia
PR

जेंगो अनचेन्ड

यामधील कहानी अमेरिकेतील स्विहील वॉरच्या आधीची आहे. एक क्रूर गुलाम बाऊंटी हंटर डॉ. किंगच्या समोर येऊन उभा ठाकतो. किंगचे आपल्या भावांबरोबर भांडण आहे. जर जांगो आपल्या भावांना जिवंत अथवा मृत पकडून आणल्यास आपण त्याला गुलामगिरीतून मुक्त करू असे किंग सांगतो.

दिग्दर्शक : क्वांटिन, ऑस्कर नामांकने : पाच (बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले, बेस्ट पिक्चर, बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर).

webdunia
PR

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi