Article Hollywood Marathi %e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%b2 %e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%a1 %e0%a4%8f%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80 112061100014_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमल हासनची हॉलीवूड एंट्री!

कमल हासन
IFM
प्रादेशिक चित्रपटामध्ये यशाचा झेंडा रोवणारा दाक्षिणात्य सिनेस्टार कलम हासन आता हॉलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'लॉर्ड ऑफ दि रिंग्ज'या हॉलीवूडपटाचा दिग्दर्शक बॅरी ऑस्बोर्नसोबत तो काम करणार असल्याची माहिती सिनेसूत्रांनी दिली. आपल्या आगामी चित्रपटामध्ये हे दोघे भारतीय वळणाची कथा हॉलीवूडस्टाईलने प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. तशी अधिकृत घोषणादेखील दोघांनी केली.

या आधी कमल हासन ऑस्बोर्नसोबत चॅम्पियन्स ऑफ हॉलीवूडमध्ये काम केले आहे. भविष्यात बिग बजेट चित्रपट तयार करण्याचा विडा या जोडगोळीने उचलला आहे. औस्बोर्न यांनी 'दि लॉर्ड ऑफ रिंग्ज' प्रमाणेच 'रिटर्न ऑफ द किंग्ज', 'दि वॉटरहाऊस', 'दि वॉरियर्स वे' आणि 'दि प्रॉफेट'सारखे अनेक दर्जेदार चित्रपट तयार केले आहेत. आता कमल हासन त्याच्यासोबत आल्याने भविष्यात दक्षिणेकडचा मसाला हॉलीवूड चित्रपटांना मिळणार असल्याने ते अधिकच तिखट झालेले दिसतील. भारतीय कथानक आणि पाश्चिमात्त्य संवेदनशीलता यांचे बेमालूम मिश्रण करून धडाकेबाज चित्रपटांची निर्मिती करण्याचा मानस ऑस्बोर्नने बोलून दाखविला. ऑर्स्बोन आणि हासन युतीचे आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी देखील स्वागत केले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi