हॉलिवूड अभिनेत्री किम कारदाशियाला नवीन प्रियकर मिळाला आहे. किम नुकतीच बास्केटबॉल खेळाडू क्रिस हमफ्रीजबरोबर एका पार्टीत दिसली. पण थोड्या दिवसा अगोदर तिला ग्रोबियल आर्बीसोबत पाहिले होते.
यूएस मॅगझिनच्या वृत्तानुसार 30 वर्षीय अभिनेत्रीला न्यू जर्सी नेट खेळाडू बरोबर सार्वजनिकरीत्या न्यूयॉर्कमध्ये बघण्यात आले.
जेड 100 जिंगल बेल स्पर्धा संपल्यानंतर या जोडप्याला जस्टीन बायबर, सेलिना गोमेज आणि केटी पेरी बरोबर न्यूयॉर्क सिटीच्या प्रोवोकेचर लाउंसमध्ये रात्री दोन वाजेपर्यंत पार्टीत मजा करताना बघितले गेले. (भाषा)