मॉडेल केली ब्रुक हिला पुन्हा एकदा सायबर हॅकर्सनी टार्गेट केले आहे. हॅकर्सनी केली ब्रुकचे न्यूड फोटो इंटरनेटवर व्हायरल केली आहेत. फिमेलफर्स्ट या वेबसाईटच्या माहितीनुसार, सायबर हॅकर्सनी केली ब्रुकचे 24 न्यूड फोटो इंटरनेटवर अपलोड केले गेले आहेत. या आधीही केलीचे फोटो हॅकर्सनी लीक केले होते.
मॉडेल-अभिनेत्री केली ब्रुक सध्या ‘वन बिग हॅप्पी’ ही इंग्रजी मालिका करत आहे. गेल्या वर्षी सायबर हॅकर्सनी केलीसह अनेक नावाजलेल्या मॉडेल्सचे फोटो इंटरनेटवर पोस्ट केले होते. यामधील एका फोटोत केली ब्रुक टॉपलेस आहे. यावेळीही हॅकर्सनी केली ब्रुकचे टॉपलेस फोटो अपलोड केले आहेत. मागच्या वेळी केलीचे फोटो हॅक झाले, त्यावेळी आता दक्ष राहण्याचे तिने बोलून दाखवले होते.