ग्लॅमर विश्वात धमाकेदार एंट्री
अमेरिकन मॉडेल निकोल रिची हिची छोटी बहीण सोफिया रिची हिने ग्लॅमर विश्वात धमाकेदार एंट्री केली आहे. सोफियाने यापूर्वी वेब सिरीजसाठी पोझ दिल्या होत्या. सोफिया सध्या न्यू लॉस एंजेलिसमधील स्विमविअर लाइन ‘मॅरी ग्रेस स्विम’साठी मॉडेलिंग करत आहे. सोफिया अवघ्या 15 वर्षाची आहे. मात्र, तिची मॉडेलिंग क्षेत्रातील एंट्री ही सगळ्यात मोठी मानली जात आहे. ग्लॅमर विश्वात सध्या सोफियाचा हॉट लूक चर्चेचा विषय बनला आहे. सोफिया सुंदर तर आहेच त्यापेक्षाही ती अधिक बोल्ड आहे. टीनेजर सोफियाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये गेल्या वर्षी तेर्सीश मॅगझिनवर स्थान मिळवले होते. सोफियाने काही गाणीही लिहिली आहेत. मात्र, आता ती फ्रीस्लाइलमध्ये लिहिणार आहे. इंस्ट्राग्रामवर सोफियाचे 280000 फॉलोव्हर्स आहेत.