पॉप स्टार ब्रिटनी तिसर्यांदा बोहल्यावर चढणार!
, बुधवार, 1 ऑगस्ट 2012 (13:16 IST)
दोनदा लग्न करूनही वैवाहिक जीवनात अपयशी ठरलेली पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र तूर्तास तिने आपले लग्न लांबणीवर टाकले आहे. कारण कोणत्याही पद्धतीने लग्नाठीत अडकायचे आहे, हे अद्याप ती ठरवू शकली नाही. अमेरिकन शो 'एक्स फॅक्टर'ची जज असलेल्या ब्रिटीनचे यापूर्वी दोनदा लग्न झाले आहे, मात्र ही दोन्ही लग्न यशस्वी ठरले नाही. आता ब्रिटनीने तिचा मॅनेजर जेसन ट्राविकबरोबर लग्न करण्याचे निश्चिक केले आहे. ट्राविकला ख्रिस्मसपर्यंत लग्नासाठी अडकायचे आहे, तर ब्रिटनी मात्र लग्न लांबणीवर टाकण्याच्या विचारात दिसत आहे.