मला भारतीय चित्रपटात काम करायचेच - मोनिका बेलुची
मला भारतीय चित्रपटात काम करायचे असून, मी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असल्याचे मत इटालियन अभिनेत्री मोनिका बेलुची यांनी व्यक्त केले आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या आगामी 'पानी' या चित्रपटात मोनिका बेलुची प्रमुख भूमिकेत असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. यासंदर्भात बोलताना मोनिका बेलुची म्हणाल्या, की भारतीय चित्रफट फॅशनवर आधारित असतात. मी यापूर्वी भारताला भेट दिलेली नाही, परंतु मी लवकरच भारताला भेट देणार आहे. मी 'बॅन्डिट क्वीन'हा चित्रपट बघितला आहे. मला भारतीय चित्रपटात काम करायचे आहे. शेखर कपूर यांनी अद्याप चित्रपटसंदर्भात माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. माझ्या मनात भारतीय चित्रपटांबद्दल कूप आदर आदर आहे. काही वर्षांपूर्वी चित्रपट निर्माते जगमोहन मुंध्रा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भूमिका अदा करण्याचा प्रस्ताव मोनिका बेलुची यांच्यासमोर ठेवला होता, परंतु हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.