मिशेल झाल्या यू-ट्यूबस्टार (पाहा व्हिडिओ)
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा सदाबहार स्वभावासाठी ओळखल्या जातात. सध्या मिशेल यांची एक व्हिडिओ क्लिप भलतीच चर्चेत आली आहे. यु-ट्यूब या संकेतस्थळावर मिशेल यांचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आली असून लाको लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडिओमध्ये मिशेल एका रिअॅलिटी शोच्या होस्ट जिम्म फॅलोन यांच्यासोबत डान्ससाठी विविध प्रकारच्या स्टेप्स घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. यावेळी मिशेल ओबामांनी एक सैल पँट आणि स्वेटर परिधान केले होते. इव्हॉल्युशन ऑफ, मॉम डान्सिंग नामक कार्यक्रमामध्ये मिशेल यांनी हे अनोखे नृत्य केले. हा कार्यक्रम राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या लेट्स मुव्ह या प्रचार अभिनयाशी संबंधित आहे. युवकांमध्ये शारीरिक फिटनेसप्रती जाणीवजागृती निर्माण व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या अमेरिकेत हा कार्यक्रम भलताच गाजतो आहे.